Take a fresh look at your lifestyle.

अमिर खान ने घरातून पळून जाऊन केले होते ‘पहिले’ लग्न! जाणुन घ्या लव्हस्टोरी

HappyBirthdayAmirKhan | मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणार्‍या अमिर खानचा आज ५५ वा वाढदिवस आहे. बरोबर ३१ वर्षांपूर्वी अमिरने बाॅलिवुडमध्ये एन्ट्री केली. कयामत से कयामत तक या हा अमिर चा पहिला चित्रपट चांगलाच हिट झाला. तेव्हापासून अमिरचे फिल्म इंडस्ट्रिमधील करियर गगनाला भिडले.

अमिरच्या करिअर विषयी आणि त्याच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र अमिरच्या पहिल्या लग्नाविषयी अनेकांना अद्याप माहिती नाही. असे म्हटले जाते की ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या शुटींगला सुरवात होण्यापूर्वीपासूनच अमिर रिना दत्ताच्या प्रेमात बुडाला होता. एकदिवस तर अमिरने रिनाला रक्ताने पत्रही लिहिले होते.

अमिरने चित्रपटाच्या शुटींग दरम्यानच रिनाशी विवाह केला. दोघांचा धर्म वेगळा असल्याने अमिरने पळून जाऊन लग्न केल्याचे बोलले जाते. मात्र या विवाहाबाबत दोघांनीही कोणाला सांगितले नाही. विवाहाच्यावेळी रिना काॅलेजमध्ये शिक्षण घेत होती. लग्नानंतर अमिरने आपले शुटींग सुरु ठेवले तर रिनाने घरात राहुन काॅलेज सुरु ठेवले. दोघांचे हे गुपचुप केलेले लग्न जास्त दिवस अंधारात राहु शकले नाही आणि एकदिवस दोघांच्याही कुटुंबियांना त्यांचे नाते कळाले.

पुढे ‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या शुट दरम्यान अमिर अभिनेत्री प्रिती झिंटाच्या जवळ आला. प्रिती आणि अमिरच्या अफेरची चर्चा तेव्हा फिल्म इंडस्ट्रित रंगली होती. प्रितिच्या येण्याने अमिर आणि रिनाच्यात दुरि निर्माण झाली. त्यानंतर प्रिती झिंटाने आपले अमिरशी अफेर नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अमिर आणि रिना यांच्यातील दुरी तशीच राहिली.

त्यानंतर अमिरचे नाव किरण राव सोबत जोडले जाऊ लागले. अमिर किरणच्या प्रेमात पडला होता. अमिरने किरणशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रिनाला तलाक दिला. अमिरच्या अशा अचानक सोडून जाण्याने रिनाला चांगलाच धक्का बसला.