हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण भारतात सुरक्षित नाही म्हणणारा आमिर खान लोकप्रियतेच्या शिखरावरून असा काही आपटला आहे कि बस्स. कधीकाळी मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा हा अभिनेता आज कित्येक चाहत्यांच्या मनातून उतरला आहे. याचा प्रत्यय त्याच ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला तेव्हाच आला. पण यानंतरसुद्धा चाहत्यांचं आणि नेटकऱ्यांचं मन शांत झालेलं नाही. तोवर आमिरने ट्रोलर्सला पुन्हा एक संधी दिली आहे. एका बँकेच्या जाहिरातीसाठी तो घरजावई झाला आहे. या जाहिरातीवरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
I just fail to understand since when Banks have become responsible for changing social & religious traditions? I think @aubankindia should do activism by changing corrupt banking system.
Aisi bakwaas karte hain fir kehte hain Hindus are trolling. Idiots.pic.twitter.com/cJsNFgchiY— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 10, 2022
काही दिवसांपूर्वी ‘ द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर हि जाहिरात शेअर केली होती. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्यासाठी बँका केव्हापासून जबाबदार रहायला लागल्या आहेत, हे मला काही समजत नाही? मला वाटते, @aubankindiaने भ्रष्ट बँकिंग व्यवस्था बदलून सक्रियता करावी. असलं बकवास काही तरी बोलतात, करतात आणि मग म्हणतात कि हिंदी ट्रोल करतात. मूर्ख.
What right the Aamir Khan has to talk abt Hindu traditions who says “Feeling unsafe in India?”#AamirKhan_Insults_HinduDharma #hindidiwas pic.twitter.com/YoEGtVhTll
— Dipika Sharma (@DipikaS10621136) October 12, 2022
यावर अनेकांनी ट्विट करीत या जाहिरातीचा निषेध केला आहे. इतकेच काय तर अनेकांनी आमिर खानला ‘धर्मावर बोलायचा हक्क तुला कुणी दिला.?’ असे विचारात आहेत. काहींनी तर ‘ आमिर मुद्दाम असे चित्रपट आणि जाहिराती करतो ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावतील’ असेही म्हटले आहे.
I just fail to understand since when AU Bank have become responsible for changing social & religious traditions⁉️
Why only Hinduism is selected for such advertisements,& if ad makers dare to make such ads considering Nikaah‼️#AamirKhan_Insults_HinduDharma pic.twitter.com/OhKt76NJfQ
— 🚩K K Sharma🙏 (@SanakkSharma2) October 12, 2022
याशिवाय आणखी काहींनी सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘हिंदू परंपरांवर बेधडक बोलणारा आमिर खान हलाला आणि तीन तलाक यासारख्या प्रथांवर बोलण्याची हिंमत करेल का..?
Here is a demand of Hindus that, AU Bank should immediately remove this ad from all social media platforms, as well as the bank and actors Aamir Khan, Kiara Advani should apologize for disrespecting Hindu tradition…#AamirKhan_Insults_HinduDharma pic.twitter.com/pIPXBGDB2m
— Prajakta (@Prajakta3071455) October 12, 2022
आणखी एका युजरने लिहिले आहे कि, ‘तुझ्यात इतकी हिंमत आहे ना तर स्वतःच्या धर्मावर आणि परंपरांवर बोटं ठेव. हिंदू परंपरांवर बोलायची हिंमतही करू नकोस तू’. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यामातून नेटकरी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत आमिरच्या जाहिरातीचा निषेध दर्शवित आहेत.
Discussion about this post