Take a fresh look at your lifestyle.

आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’च्या शूटिंगसाठी आमिर खान लडाखमध्ये दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवर, वैद्यकीय व्यवस्थेवर तसेच शासन यंत्रणेवर दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने नवे निर्बंध लागू केले आहेत. यामुळे चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आमिर खानचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढा यातील काही सीन चित्रित करण्याची तयारी सुरु असल्याची बातमी मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे काही सीन बाकी होते ज्यांचे शूट लडाखमध्ये होणार होते. त्याचवेळी सोशल मीडियावर असे दिसून येत आहे की आमिर खान आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण कारगिलच्या काही लोकेशन्सवर करत आहे. सुमारे ४५ दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण येथे करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान लष्करी सैनिकांसह मास्क परिधान करून चालत आहे.

अभिनेता आमिर खान आणि करिना कपूर खानचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटात टॉम हँक्स हा हॉलिवूड अभिनेता मुख्य भूमिकेत दिसला होता. तर हिंदी रिमेकमधील मुख्य भूमिका अमीर खानच्या पदरी पडली आहे. अमीर खानने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. त्यामूळे आमिरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमीर खान याची बॉलिवूडमधील ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी असून त्याने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या विविध भूमिका आणि अभिनय शैलीच्या जोरावर तो नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो.