Take a fresh look at your lifestyle.

‘पानिपत’च्या घवघवीत यशासाठी आमिरच्या शुभेच्छा !

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | तब्बल वर्षभरापासून उत्सुकता लागून असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ६ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या लढाई वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अर्जुन कपूर , क्रिती सेनॉन , संजय दत्त या तगड्या कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ट्विट केले आहे. “आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाला माझ्या शुभेच्छा. या चित्रपटाला घवघवीत यश मिळो” अशा शब्दात आमिर खानने शुभेच्छा दिल्या. आमिरच्या या ट्विटवर अभिनेता अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. ”धन्यवाद आमिर सर, आम्हाला आशा आहे कि तुम्हाला आमचा चित्रपट नक्की आवडेल” अशा शब्दात अर्जुनने आमिरचे आभार मानले.


दरम्यान “मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दरम्यान मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही चित्रपटात महत्वाच्या भूमिका असून मराठी कलाकारांची मोठी फौज देखील चित्रपटात अभिनय करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: