Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडमधील पदार्पणासाठी अमिताभ बच्चन यांनी बाबीलला दिल्या शुभेच्छा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता इरफान खानकडे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. इरफानच्या निधनाला एक वर्ष होत आले आहे. त्याचा मुलगा बाबिल वडिलांच्या आठवणीत सतत पोस्ट करत असतो. आता बाबील वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच अनुष्का शर्माच्या ‘काला’ या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यानिमित्ताने ‘काला’ची एक झलक पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी बाबिलला त्याच्या डेब्यूसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर ‘काला’ चा टीझर शेअर केला आहे. सोबतच बाबील खानच्या बॉलीवूड डेब्यूची माहिती दिली आहे. त्यांनी हि पोस्ट करत लिहिले कि,’अन्विताजी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, हे खुपचं वेगळं दिसत आहे, टीझर बघूनचं खूप छान वाटत आहे’. अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर बाबिलचा आनंद द्विगुणीत झाला होता. बाबिलने अमिताभ यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून आपल्या स्टोरीला पोस्ट करीत आनंद व्यक्त केला आहे.

Insta Story

कालाद्वारे अनुष्का शर्माची निर्मिती संस्था क्लीन स्लेट फिल्म्स पुन्हा एकदा नेटफ्लिक्स सोबत काम करताना दिसतेय. याआधी त्यांचा ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ‘काला’ चित्रपटाचे दिग्दर्शन अन्विता दत्त यांनी केले आहे. या चित्रपटात बाबिलसह तृप्ती डमरी दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून सर्वांना त्याच्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागली आहे. टीझरवरून चित्रपटाचे शुटींग बर्फाळ प्रदेशात झाले असल्याचे दिसून येते. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र टीझरनंतर बाबिलचे कलाक्षेत्रात सर्वांकडून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.