Take a fresh look at your lifestyle.

‘रनवे 34’ बॉलिवूडच्या महानायक आणि सिंघमचा संगम; पहा ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील महानायक अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगन हे लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. ‘रनवे 34’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये अजय देवगन वैमानिकाच्या भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून यात अजयचं पात्रं पूर्णपणे रहस्यमयी ठेवलं गेलं आहे. यात त्याच्यासोबत को-पायलट म्हणून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दिसतेय. चित्रपटाच्या ट्रेलरनुसार अजय आणि रकुल मिळून काहीतरी सत्य लपवत आहेत पण ते नक्की काय आहे हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यात कॅप्टन विक्रांत खन्ना यांची भूमिका अजयने साकारली आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंह हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

‘रनवे ३४’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अजय देवगनने तमाध्यमांशी संवाद साधला आहे. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला कि, “डोळे बंद करा आणि विचार करा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती एकदा तरी आली असेल जेव्हा आपण एका क्षणासाठी सर्वांत शक्तीशाली आहोत असं वाटेल आणि पुढच्याच क्षणी पूर्णपणे असहाय्य आहोत असं वाटू लागतं. आपण जग जिंकू शकू असं वाटत असतानाच सर्वकाही हातातून निसटल्यासारखं होतं. हे एक भयानक स्वप्न आहे की वास्तव, हेच कळत नाही. अशाच भावनांशी निगडीत हा चित्रपट आहे.”

रनवे ३४ या चित्रपटाची निर्मिती अजय देवगन एफ फिल्म्स, कुमार पाठक, विक्रांत शर्मा, संदीप केवलानी, तारलोक जेठी, हस्नैन हुसैनी आणि जय कनुजिया यांनी केली आहे. तर हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर अर्थात २९ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर इतका उत्कंठतावर्धक आहे कि तो पाहून प्रेक्षक चित्रपटाबाबत फारच उत्सुक झाले आहेत. चित्रपटातील अधोरेखित सत्य जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट पाहणे जरुरी आहे.