Take a fresh look at your lifestyle.

कोरोना योद्ध्यांसाठी सरकारने नक्की काय केलं ?; बिग बींच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | जगभरात कोरोना विषाणूचा कहर पहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. दिवसेंदिवस कोरोनाच संक्रमण वाढतच चालले असून देशासाठी हे फारच धोकादायक ठरत आहे. कोरोनामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत करोना योद्ध्यांसाठी सरकार काय उपाययोजना करतंय? असा प्रश्न अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नाला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिलं .

अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी करोना योद्ध्यांसाठी केलेल्या उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले, “करोना योद्ध्यांना आम्ही दिवसरात्र मदत करतोय.५० लाख रुपयांचं विमा संरक्षण देखील दिलं आहे. तसेच त्यांच्या येण्या-जाण्यासाठी खास गाड्यांची सोय केली आहे. जी मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करतायेत त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभं आहे. त्यांनी काळजी करु नये.” असं आश्वासन त्यांनी या मुलाखतीमध्ये दिलं.

दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात ३१ हजार ११८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ६२ हजार ८१० वर पोहचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.