Take a fresh look at your lifestyle.

रोहित शर्माच्या खेळीवर अमिताभ यांचे ‘अविश्वसनीय’ उद्गार !

सोशल कट्टा । इंडिया व्हर्सेस न्युझीलँड च्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने धडाकेबाज विजय मिळवला त्याचा शिल्पकार ठरला रोहित शर्मा. धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टी -२० मालिका जिंकण्याचा विक्रम केला.

या मालिका विजयाचा आनंद संपूर्ण देशवासीयांसोबतच बॉलिवूडचे महानायाक अमिताभ बच्चन देखील साजरा करत आहेत. त्यांनी ट्विटरव्दारे आपला आनंद व्यक्त केला. रोहित शर्माने मारलेल्या शेवटच्या षटकाराचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘अविश्वसनीय’ असे म्हणत केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Comments are closed.

%d bloggers like this: