हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या ऐतिहासिक महानाट्याचे सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. संभाजीनगर, कोल्हापूरन निपाणी, सातारा, कराड, नाशिक यानंतर आता हे भव्य महानाट्य पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पोहोचले आहे. पुण्यातील पिंपरी भागात हिंदुस्थान अँटीबायोटिक्स मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. खासदार अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीतून साकारलेल्या या नाट्याला पुणेकर आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यन महानाट्याचे प्रयोगस्थळी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दर्जा उद्योग समूहाच्या वतीने टी शर्टचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर विविध प्रकारचे टीशर्ट, कीचॆन, कॉफी मग आणि कॅप्स उपलब्ध आहेत आणि ते महानाट्य पहायला आलेल्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे फोटो प्रिंट असलेले टीशर्ट या स्टॉलवर उपलब्ध आहेत. हे टी शर्ट मुख्य करून लहान मुलांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य पहायला आलेले बच्चे कंपनीचे पाय या स्टॉलकडे वळताना दिसत आहेत. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी या टीशर्ट्सना खास पसंती दाखवली आहे.
‘या आठवड्यात आणखी काही प्रयोग या मैदानावर होणार असून शिवप्रेमींनी हे नाट्य पाहण्यासोबतच दर्जेदार टीशर्ट खरेदी करावेत आणि आपल्या राजाचं राजपण दर्शवणारे टी शर्ट जसे आपण घालून मिरवाल तसेच हे टी शर्ट जेव्हा वापरून जुने होतील तेव्हा त्यांची योग्य ती काळजी घ्याल हि अपेक्षा…’, असे आवाहन दर्जा उद्योग समूहाच्या संचालिका कीर्ती जाधव यांनी केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच सेवेसाठी ग्राहक ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकतात, अशी माहिती दर्जा उद्योग समूहाचे संचालक शुभम गायकवाड यांनी दिली. यासाठी दर्जा फॅशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा 8766749439 / 9921882482 या नंबरवर संपर्क करा.

Discussion about this post