Take a fresh look at your lifestyle.

वाटलं नव्हतं टायर असा घाम काढेल; अमोल कोल्हेंची मजेशीर इन्स्टा पोस्ट व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जेव्हापासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय तेव्हापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलय. यातील गाणी, डायलॉग सगळंच कसं अव्वल आहे. त्यामुळे अजूनही याची नशा सोशल मीडियावर कायम आहे. यात आता राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीदेखील आपल्या एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘पुष्पा नाम सून के फ्लॉवर समझे क्या..? फ्लॉवर नहीं फायर है मैं! मै झुकेगा नहीं साला या डायलॉग्सच्या आशयाचा वापर केला आहे. हा व्हिडीओ अमोल जेव्हा टायरसोबत फिटनेस बनवीत होते तेव्हाच आहे.

 

अभिनेता अमोल कोल्हे हे फिटनेस फ्रिक असल्यामुळे ते फिटनेसकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. दरम्यान त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी ‘पुष्पा’स्टाईल कॅप्शन दिलंय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला… लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल!”. इतकं मजेशीर कॅप्शन आणि हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीदेखील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केलाय. शिवाय विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अभिनेता अमोल कोल्हें यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यांपैकी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, फायर है बॉस!. तर दुसऱ्याने म्हटलंय कि, शेर की झलक सबसे अलग. आणखी एकाने लिहिलं आहे कि, सर, तुम्ही रॉकस्टार अहात. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, तुम्ही बालपणीची आठवण करून दिली. आणखी एका युजरने लिहिले कि, कधी कधी प्रश्न पडतो खरच तुम्ही खासदार आहात का ? ग्रेट आहात आपण. तर आणखी एकाने लिहिले कि, आम्हांला विश्वास आहे तुम्ही थकणारे नाहीत ते.