Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीस यांचे ॲनिवर्सरी स्पेशल गाणे ट्रोल; सोशल मीडियावर नुसता हास्यकल्लोळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गाण्याच्या किती शौकीन आहेत हे तर आपण सारेच जाणतो. यामुळे त्या नेहमीच आपल्या स्वरबद्ध गाण्यांची विविध प्रकारे झलक घेऊन येत असतात. आजकाल सणवार पाहून प्रदर्शित होणाऱ्या गाण्यानंतर अमृता फडणवीस यांचे ॲनिवर्सरी स्पेशल गाणे फारच चर्चेत आहे. शुक्रवारी अमृता यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे प्रदर्शित केले आहे.

मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या लग्नाचा वाढदिवस हे या गाण्याचे कारण ठरले आहे. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांनी पती देवेंद्र फडणवीस याना शानदार स्वरमय असे गिफ्ट दिले आहे. हे गाण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पण यातील काही कमेंट्स सकारात्मक तर काही ट्रोल करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या आहेत. नेटकऱ्यांनी अक्षरशः सोशल मीडियावर हास्यकल्लोळ उठवला आहे. काहींनी तर अमृता यांची तुलना ड्रामाक्वीन राखी सावंत सोबतही केली आहे.

‘सध्याच्या तापलेल्या राजकीय घडामोडींमध्ये या कूल गाण्याचा आस्वाद घ्या’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी हे ॲनिवर्सरी स्पेशल गाणे प्रदर्शित करण्याहेतू आपलय सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. तसेच लग्नाच्या वाढदिवसासाठीचे हे स्पेशल गाणे असल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी स्वतःच नमूद केले आहे. अमृता यांनी त्यांच हे नव गाण श्रीलंकन गायिका योहानी हिच्या नुकत्याच जगभर प्रसिद्ध झालेल्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर प्रेरित होऊन गायले आहे. शिवाय मनिके मागे हिते या प्रसिद्ध गाण्याचे हे हिंदी वर्जन असल्याचे अमृता फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

हे गाणे प्रदर्शित होऊन फक्त एक रात्र उलटली असताना सोशल मीडियावर या गाण्यासाठी प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. अनेक नेटकऱ्यांनी अमृता यांच्या आवाजाचे आणि गाण्याचे कौतूक केले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी अमृता यांच्या समवेत त्यांच्या गाण्याची आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांचीही खिल्ली उडवली आहे. एका नेटकाऱ्याने ट्रोल करताना लिहिले कि, रामदास आठवले नंतर मामीच राजकारणाचा कारभार हलका फुलका करायचा कारोबार सांभाळणार… फक्त आणि फक्त #मामी. तर अन्य एका नेटकाऱ्याने लिहिले कि, गरुड पुराण मध्ये तुम्ही हे गाणे बनवले म्हणून वेगळ्या शिक्षेची तरतूद केली आहे. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत लिहिले कि, मामी, खतरनाक….पण तो तुमच्या बाहू मध्ये समेटणार नाही, कारण वह बहुत जाडा हैं।