Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीस यांचे शिव तांडव स्त्रोत्रम् रिलीज; काही तासांतच हजाराहून अधिक लाईक्सचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या गायनाची कला जोपासत आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांची अनेक गाणी अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसतात. तर अनेक नेटकरी त्यांना ट्रोलदेखील करतात. मात्र अमृता काही थांबल्या अहित. त्यांनी विविध तऱ्हेची गाणी गायली आहेत. यानंतर आता शिवरात्र जवळ येत आहे. यानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवे गाणे आज रिलीज झाले आहे. शिव तांडव स्तोत्रम या गाण्याचा अल्बम आज रिलीज होण्याबाबतची माहिती अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली होती. यानंतर अखेर आज हे गाणे रिलीज झाले आणि अगदी काही तासांतच हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अमृता फडणवीस यांचे शिव तांडव स्त्रोत्रम् हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. अगदी काही तासांतच या गाण्याने प्रेक्षकांची खास पसंती मिळवली आहे. दरम्यान या गाण्याला हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ५० गाजराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय अनेकांनी कमेंट्स करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेकांनी ओम नमः शिवाय आणि सुंदर गाणे अशी कमेंट केल्याचे दिसत आहे. खूप छान.. काय आवाज आहे म्हणत अमृता यांचे कौतुक देखील केले आहे.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. यामुळे अमृता यांनी मंगळवारी सोशल मीडिया ट्विटर हँडलच्या माध्यमातून शिव तांडव स्त्रोत्र या गाण्याचा अल्बम गुरुवारी २४ रिलीज होत आहे असे अल्बमचे पोस्टर ट्विट करून माहिती दिली होती. या शिव तांडव स्त्रोत्रम गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनी देखील आज अमृता यांचे कौतुक केले आहे. अमृता यांनी गाण्याविषयी सांगितले कि, हे गीत म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी भक्ती, शुद्ध अध्यात्म, देवत्व यांचे परम आहे. शिव तांडव स्त्रोत्रम या त्यांच्या गाण्याची व्हिडिओ निर्मिती नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली आहे. तर संगीत दिग्दर्शन विजय दाणी यांनी केले आहे.