Take a fresh look at your lifestyle.

दळभद्री.. साध्वी म्हणू का राजकारणातील राधे माँ?; आगामी गाण्याची घोषणा करताच फडणवीस मामी ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांची गायकी आपण सारेच जाणतो. अमृता फडणवीस यांना गायनाची अत्यंत आवड असल्यामुळे त्यांनी आपली आवड जोपासत आतापर्यंत अनेक गाणी गेली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्याला त्यांच्या चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर अनेकांनी अमृता यांना ट्रोलदेखील केले आहे. यानंतर सोमवारी व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक विशेष ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे. यासोबतच नेटकऱ्यांनी एकही मिनिट न घालवता त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाइन्स डे’चे औचित्य साधत या दिवसाचा संदर्भ देत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी आपल्या आगामी गाण्याबद्दल घोषणा केली आहे. अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होईल असे सांगत स्वत:चा एक फोटोही पोस्ट केलाय.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, मी तुला निवडले आता आणि कायमचे…. माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस…. हा #व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो…., मी माझ्या रुद्र #व्हॅलेंटाईन ……#लॉर्ड शिवाला माझे संगीतमय स्तुती अर्पण करते! अमृता फडणवीस यांचे हे ट्विट पाहून हे गाणे भगवान शिवशंकर यांचे स्तुतीसुमन असेल असे वाटत आहे. मात्र हे ट्विट पाहताच नेटकरी खवळले आणि ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले कि, साध्वी अमृतासिंग म्हणायचे का आज पासून ? तर अन्य एकाने लिहिले, नाही, राधे मां.. याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, काय हीं दळभद्री लक्षणे… कुठे भोळासांबा? कुठे भस्म लावून कडक तपःश्चर्या करणारे देवाधिदेव महादेव?.. आणि कुठे ऐहिक सुखांना हपापलेली हावरट स्वार्थी महिला.. सवंग प्रसिद्धीसाठी शंकराचा गैरवापर.. आचार्य बुवा उठसूट धर्मोपदेश करता.. आमच्या देवदैवतांचा धडधडीत अपमान कसा डोळे मिटून सहन करतां..

तर आणखी एकाने देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट केलं आहे आणि लिहिलं कि, मामी, पहिल्या दोन लायनी वाचून आणि valentine चा मुहूर्त म्हणून आम्हाला वाटले सायबा विषयी बोलत आहात…. पण नंतर ट्यूब पेटली, तुमच्या छोट्याश्या हृदय/डोकं/आत्मा.. वगैरेमध्ये एवढं कलिंगड कुठलं मावायाला!