Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता फडणवीसांनी पंजाबी गाण्यातून चाहत्यांचा ‘मूड बना लिया’; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in व्हिडिओ, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Amruta Fadanavis
0
SHARES
77
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे हे काही वेगळे सांगायला नको. आजपर्यंत त्यांनी अनेक गाणी गाऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विविध माध्यमातून ट्रोल होऊनही अमृता फडणवीस यांनी गाणे सोडले नाही. हिंदी, मराठी गाण्यांनंतर आता अमृता यांनी पंजाबी गाणे गायले आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या आगामी गाण्याची एक झलक शेअर केली होती. ‘आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे शुक्रवारी रिलीज झाले आहे. अमृता यांच्या चाहत्यांनी या गाण्याला विशेष पसंती दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम असे म्हणत हे गाणे रिलीज केले आहे. हे गाणे ६ जानेवारी २०२३ रोजी, शुक्रवारी टी- सिरीजच्या युट्युब चॅनेलवर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी जबरदस्त ठुमके लगावले आहेत. शिवाय या गाण्यातील त्यांचा वेस्टर्न लूक अतिशय लक्षवेधी ठरतो आहे. या गाण्याला अमृता फडणवीस यांच्यासह मित ब्रोजचे देखील स्वर लाभले आहेत. इतकेच नाही तर या गाण्याचे म्युझिकसुद्धा मित ब्रदर्सनेच केले आहे. त्यामुळे तरुणाईचे लक्ष वेधण्यात या गाण्याचे म्युझिक मोठी भूमिका निभावत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

या गाण्यात होणाऱ्या नवरीची बॅचलरेट पार्टी सुरु आहे. ज्यामध्ये अमृता तिची मैत्रीण म्हणून सामील होतात आणि गाणे गाऊन मजा आणतात अशी गाण्याची थीम आहे. या गाण्यात अविनाश मिश्रा आणि मेहक घाई या कलाकारांसोबत अमृता फडणवीस ठुमके लगावत आहेत. या आधीदेखील अमृता यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यातील काही गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. तर काही गाण्यांमुळे अमृता यांना ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागला. आता या नव्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, अमृता यांच्या चाहत्यांनी तर गाण्याला पसंती दिली आहे. पण ट्रोलर्सने थेट निशाणा साधला आहे. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्याची जबाबदारी ट्रोलर्स उत्तमरीत्या निभावत आहेत.

Tags: Amruta FadanvisInstagram PostNew Song Releaseviral postYoutube Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group