Take a fresh look at your lifestyle.

अमृताच्या ‘या’ फोटोशूटने सोशल मीडियावर लावली ‘आग’…

चंदेरी दुनिया । मराठी सिनेसृष्ट्रीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.

मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जात आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. नुकतेच अमृताने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहेत. यात ती खूपच स्टनिंग आणि हॉट दिसतेय. अमृताच्या फॅन्सनी तिच्या या फोटो शूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अमृता सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अमृताचाच बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


Comments are closed.

%d bloggers like this: