Take a fresh look at your lifestyle.

क्रूज ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेचा कबुलीनामा; आर्यन खानला ड्रग्ज पुरवले, पण..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नंतर आता चंकी पांडेची लेक अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव वॉट्सअप चॅटमूळे समोर आले आहे. यामुळे अनन्या पांडेला क्रूज ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीच्या दुसऱ्या फेरीत अर्थात गुरुवारी तब्बल ४ तास NCBने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात विचारणा केली आहे. दरम्यान, अनन्याने हे कबूल केले की, तिने आर्यन खानला वीड अर्थात गांजा दिला होता. पण यासह तिने सांगितले कि ती कोणत्याही ड्रग पुरवठादार वा पेडलरच्या संपर्कात नाही.

NCB सूत्रांनुसार, अनन्याने चौकशीत सांगितले की, ती वीड पुरवण्याच्या व्यवसायात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. तिचा एक मित्र आहे जो प्रसिद्ध, प्रभावशाली व्यक्ती आहे आणि तो मागणी केल्यावर हे पदार्थ पुरवतो. यामुळे आर्यनच्या सांगण्यावरून अनन्याने या मित्राला १-२वेळा वीड देण्यास सांगितले होते. जे त्याने त्याच्या स्टाफमार्फत पाठवले होते आणि अनन्यानेही तिच्या स्टाफकडून घेतले. यानंतर जेव्हा ती आर्यनला भेटली तेव्हा तिने ते आर्यनला दिले. याचाच त्या चॅटमध्ये उल्लेख आहे.

यानंतर NCBने शुक्रवारी पहाटे संबंधित हाऊस स्टाफला चौकशीसाठी आणले होते आणि संध्याकाळी त्याला जाण्याची परवानगी दिली. पण त्याचा फोन जप्त करून सोमवारी पुन्हा बोलावले आहे. सोमवारी अनन्यालादेखील तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

NCB सूत्रांनुसार हाऊस स्टाफसह केलेल्या चौकशीत आणि मिळालेल्या चॅटमधून एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या ड्रग्स कनेक्शनची लिंक सापडली आहे. यामुळे अनन्याच्या दोन्ही मोबाईल फोनचा डाटा पुनर्प्राप्त केला जात आहे. यावरून अनन्याने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला वीडबद्दल जास्त माहित नसून ती त्याला ‘जॉईंट’च्या नावाने ओळखते. तिला जॉइंट म्हणजेच वीड वा गांजा आहे हे माहित नव्हते. शिवाय, गेट टूगेदर दरम्यान तिने ट्राय करण्याच्या उद्देश्याने काही पफ्स घेतले होते. तिने ना ड्रग्स सप्लाय केले ना सेवन केले, असा दावा तिने केला आहे.