Take a fresh look at your lifestyle.

आणि…., ही माझी तिसरी वेळ; सुप्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियोंना कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा नवा व्हेरियंट चांगलाच कहर करतोय. सर्वसामान्य, नेते मंडळी आणि बॉलिवूडकरांनाही कोरोनाचा विळखा आता घट्ट जखडु लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडकरांना कोरोनाने पळता भुई फार केले असताना अनेकांना पुन्हा पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस आणि पूर्ण काळजी घेऊनही झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो यांना चक्क तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर सलग तीन ट्विट केले आहेत.

बाबुल सुप्रियो यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले कि, आणि…. आणि, ही माझी तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर २० मध्ये जेव्हा मी माझी आई गमावली आणि कसेतरी माझ्या वडिलांना वाचवले, नंतर पुन्हा 21 एप्रिल आणि आता पॉझिटिव्ह असण्याची खरोखर काळजी नाही पण संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या आणि ते कोणी कोणाकडे संसर्गित केले हे शोधण्याचा कोणताही मार्ग नाही. खूप कमी लोक मास्क परिधान करत आहेत. यानंतर त्यांनी आणखी दोन ट्विट केले आहेत.

यातील दुसऱ्या ट्विटमध्ये बाबुल सुप्रियो यांनी लिहिले कि, मी, माझी पत्नी, बाबा, अनेक कर्मचारी, सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, परंतु माझी चिंता ही आहे कि, कोरोनाने गंभीरपणे ग्रस्त असलेल्या रुग्णांना कॉकटेल जॅब दिला जातो. ज्याची किंमत रु.61000/- आहे आणि ते गंभीर आजारी रुग्णांना देणे आवश्यक आहे. माझ्या ८४ वर्षांच्या वडिलांना जॅब एसओएसची गरज होती आणि मला ते जागेवरच विकत घ्यावे लागले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एखाद्याला त्याची गरज असेल तर तो कसा विकत घेणार?

यांनतर तिसऱ्या ट्विटमध्ये बाभूळ सुप्रियो यांनी लिहिले कि, पूर्णपणे लसीकरण झालेले देखील नव्या संक्रमणाचा प्रतिकार करू शकत नाही. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसोबतच सरकारी रुग्णालयांमध्ये ही जॅब उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने त्वरीत कार्यवाही करणे आवश्यक आहे. लसीकरण आवश्यक आहे पण कॉकटेल ही काळाची गरज आहे.

० कॉकटेल जॅब म्हणजे काय?
– कॉकटेल जॅब दोन लस मिसळून एकत्र दिले जाते. यामुळे कोरोना विषाणूविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती मिळते. संशोधनात असा दावाही करण्यात आला आहे की, कॉकटेल जॅबमुळे शरीरात दीर्घकाळ प्रतिकारशक्ती राहते.