Take a fresh look at your lifestyle.

इरफानच्या ‘अंग्रेझी मिडीयम’चा भन्नाट विनोदी ट्रेलर रिलीज

पिच्चर अभी बाकी है | इरफान खान लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा तुफान विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. इरफानला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

ट्रेलरची सुरुवात ही इरफानची मुलगी राधिका मदनच्या शाळेपासून होते. राधिका अतिशय हुशार असल्यामुळे शाळेमध्ये तिला गौरवण्यात येते. त्यानंतर राधिकाला पुढील शिक्षणसाठी परदेशात जायचे असते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इरफान प्रयत्न करत असतो. या कॉमेडी चित्रटात करिना कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे.

हा चित्रपट २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. नुकताच इरफानने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या क्षणचित्रांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात एक संदेश रेकॉर्ड केला होता.

Comments are closed.

%d bloggers like this: