Take a fresh look at your lifestyle.

‘आणि काय हवं? ३’ म्हणजे कमाल..बहार; लॉकडाऊनमधली धमाल घेऊन जुई साकेत परतणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक कपल म्हणजे नेमकं काय… ? असा प्रश्न तुम्हाला कशी पडलाय का? अर्थात एकमेकांना अनुरूप असणे, नाते टिकवण्यासाठी सतत धडपडणे, सात्विक आणि संसारी असे परिपक्व नाते सांभाळणे, एक चुकलं तर दुसऱ्याने सांभाळून घेणे? हे असच काहीस वैवाहिक जीवनातील सुरुवातीच प्रत्येकाचं सो सिम्पल असं गणित असतं नाही का? पण जशी वर्षे सरतात तशी हि गणित उलटी पलटी होतात आणि मग जे सुरु होत आपण त्याला संसार म्हणून शकतो. कारण थोडं आंबट, थोडं गोड, थोडं तिखट आणि कधीतरी थोडं कडू असं नातं असेल तर ते भन्नाट कपल म्हणून ओळखणे सोप्पे जाते नाही का.. हे असच हळू हळू फुलणार आणि मायेने बहरणार प्रेमाचं नातं आहे आपल्या जुई आणि साकेतच. त्यांच्या या प्रेमाचा गोडवा घेऊन ते ‘आणि काय हवं’चा तिसरा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या वेबसीरिजच्या पहिल्या पर्वामध्ये जुई आणि साकेत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील प्रत्येक पहिल्या वहिल्या गोष्टीचा आनंद साजरा केला आहे. तर, दुसऱ्या सिझनमध्ये लग्नाचे तिसरे वर्षं साजरे करत एकमेकांसोबत जुन्या नव्या आठवणी आणि मनामनांत साचलेल्या भावना शेअर केल्या आहेत. त्यानंतर आता सीझन तीनमध्ये जुई आणि साकेतचा संसार पाच वर्षांचा टप्पा पूर्ण करताना दिसणार आहेत. शिवाय त्यांच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि अल्लड वेडेपण जगभरातील लॉकडाऊन दरम्यानची अवस्था दर्शविणार आहे.

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं ३’ मध्ये जुई साकेत म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामतच दिसणार आहेत. तर एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित हा सीजन येत्या ६ ऑगस्टपासून एमएक्स प्लेयरवर पाहता येईल. याबाबत बोलताना प्रिया म्हणते, “हा सीझन आपल्याला लॉकडाऊनदरम्यानच्या जीवनात घेऊन जाणारा आहे. या काळात अनेकांच्या नातेसंबंधांमध्ये अनेक बदल झाले. लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुई आणि साकेतचे नातेही समृद्ध होत आहे. मी आणि उमेशही खऱ्या आयुष्यात यातील काही क्षण जगलो आहोत. आता जुई आणि साकेत पुन्हा तुमच्या भेटीला येण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.”

तर उमेश म्हणतो, “यशस्वी वैवाहिक जीवनासाठी नात्यात संवाद आणि मैत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराला समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हाच संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे. या जोडप्यांमधील गंमतीजंमती आणि कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देणे म्हणजे प्रिया आणि माझ्या ऑफस्क्रीन नात्याचे प्रतिबिंब आहे. मला खरोखरच असे वाटते, की आमच्यातील थोडा स्वभाव, गुण जुई आणि साकेतमध्ये आहेत.”