Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या आठवणीने भावुक झाली अंकिता ; म्हणाली तू जिथे कुठे असेल तिथे खुश रहा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला आता 2 महिने झाले आहेत. सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे यांनी सुशांतबद्दल एक पोस्ट शेअर केले आहे. अंकिताने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘तुला जाऊन 2 महिने झाले आहेत आणि मला माहित आहे की तुआता जिथे असेल तिथे आनंदी रहाल’. यानंतर अंकीताने चाहत्यांना आवाहन केले की “कृपया 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुशांतच्या जागतिक प्रार्थना मेळाव्यात सहभागी व्हा”.

अंकिताने आणखी एक पोस्ट केली आहे ज्यात तिने जोडलेल्या हातांनी आपला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अंकिताने लिहिले की, ‘हात जोडून तुमचा फोटो शेअर करा आणि सुशांतच्या ग्लोबल प्रार्थनामध्ये सामील व्हा’.

सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्ती यांनी 15 ऑगस्ट रोजी सुशांतसाठी ग्लोबल प्रार्थना मेळावा घेतला आहे. अंकिता लोखंडेचा प्रियकर विक्की जैन यांनीही सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विकीने लिहिले आहे की, ‘आपणा सर्वाना विनंती आहे की सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रार्थना मेळाव्याला 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.’