Take a fresh look at your lifestyle.

अंकिता झाली भावूक ; इंस्टाग्रामवर शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिताने सुशांतच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच दिवसांनंतर ती पुन्हा आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Believe you both are together ❤️ #warriors4ssr

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

फोटोमध्ये अंकिता देखील भावूक होताना दिसत आहे. फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये ‘मला विश्वास आहे तुम्ही दोघे आता एकत्र असाल..’ असं लिहलं आहे. अंकिताची ही पोस्ट पाहत अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि चाहत्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

एवढचं नाही तर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने देखील कमेंट केली आहे. ‘दोघे आता एकत्र असतील.. आपल्या न्याय मिळत नाही तोपर्यंत लढायचं आहे.’ अशी कमेंट सुशांतच्या बहिणीने केली.

Comments are closed.