Take a fresh look at your lifestyle.

अंकिताचा खुलासा ; मी कधीच म्हणले नाही की सुशांतची हत्या झाली, मी फक्त त्याला ….

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि माजी प्रेयसी अंकिता लोखंडे सातत्याने एकमेकींवर आरोप करत होत्या . आता सोशल मीडियावर एक पोस्ट करत अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असं अंकिताने म्हटलं आहे. याविषयी तिने एक मोठी पोस्टशेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीविषयी भाष्य केलं आहे.

“मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते. मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि कोणाला दोषीदेखील म्हटलेलं नाही. मी कायम माझ्या मित्रासाठी, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांची साथ देत आहे. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.

दरम्यान, अंकिताने या पोस्टमध्ये रिया चक्रवर्तीलादेखील काही प्रश्न विचारले आहेत. जर तुझं इतकं प्रेम होतं तर त्याला ड्रग्स घेताना अडवलं का नाही?,असं अंकिताने विचारलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अंकिता लोखंडे सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’