Take a fresh look at your lifestyle.

सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार अंकिता लोखंडे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला. कारकिर्दीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशांतची आत्महत्या अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतची नक्की आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सध्या सीबीआयकडून करण्यात आला आहे. त्यातच सुशांतचे चाहते आणि त्याची आधीची प्रेयसी अंकिता लोखंडे मिळुन सध्या त्याचं एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

सुशांत कायमच पर्यावरण, आकाशगंगा आणि अशा काही विषयांच्या कलानं त्याची अभिरुची दाखवत होता. जवळपास १००० रोपं लावण्याचं सुशांतचं स्वप्न होत. त्याचं हेच स्वप्न साकारण्यासाठी म्हणून अंकिताला रोपं खरेदी करताना पाहिलं गेलं. सुशांतचं स्वप्न साकार करण्यासाठीच आपण हे करत असल्याचं सांगत अंकिताने सुशांतच्या चाहत्यांनाही यात हातभार लावण्याची विनंती केली आहे.

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिनंसुद्धा मागील आठवड्यातच,  #Plants4SSR अशी मोहिम राबवत शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’