Take a fresh look at your lifestyle.

‘मी असताना सुशांत कधीच नैराश्यात नव्हता’; अंकिताचं रियाला प्रत्युत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग आत्महत्या तपास चालू असतानाच अनेक कलाकार एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांतची माजी प्रेयसी आणिअभिनेत्री अंकिता लोखंडेचा उल्लेख केला. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अंकिता सुशांतच्या संपर्कात असल्याचं रियाने म्हटलं. त्यावर अंकिताने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. या पोस्टमध्ये अंकिताने रियाचे सर्व दावे फेटाळले आहेत.

२०१३ मध्ये सुशांत पहिल्यांदा नैराश्याला सामोरं गेला होता, असं रियाने मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावरही अंकिताने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सुरुवातीपासून ते २३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो. त्यादरम्यान त्याला कधीच नैराश्याचा त्रास नव्हता आणि तो मानसोपचारतज्ज्ञांनाही भेटला नव्हता. तो एकदम ठीक होता’, असं अंकिताने स्पष्ट केलं.

सुशांतसोबत संपर्कात असल्याच्या रियाच्या आरोपावरही अंकिताने पुढे लिहिलं, ‘आमच्या ब्रेकअपनंतर मी सुशांतच्या संपर्कात होते असं मी कधीच कुठे म्हटलं नाही. मणिकर्णिकाच्या शूटिंगदरम्यान सुशांतने एका इन्स्टा पोस्टवर माझ्यासाठी कमेंट केली होती. माझ्या प्रोजेक्टसाठी त्याने शुभेच्छा दिल्या होत्या आणि मीसुद्धा त्याला केवळ धन्यवाद म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही फोनवर बोललो हा रियाचा दावा मी फेटाळते. तसेच आपण रियाला ओळखत नाही आणि सुशांतसोबत तिच्या रिलेशनशिपलाही ओळखत नाही असंही अंकिताने स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’