Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऐकत नाय चंद्रा! अमृतालाही लाजवेल अशी अवतरली सुंदरा; व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
AnkurWadhave
0
SHARES
27
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एप्रिल महिन्याच्या २९ तारखेला मराठी चित्रपटसृष्टीत चंद्र नावाची अप्सरा अवतरली. तिने बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं कि आजही तिची भुरळ कायम आहे. चंद्रा या भूमिकेतून अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. दरम्यान ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून अमृताने विविध बहारदार लावण्या सादर केल्या. यातील चंद्रा हे गाणे तुफान गाजले.

अवखळ आणि नटखट अदा दर्शविणारे हे गाणे सोशल मीडियावर रिल्स करण्यासाठी प्रचंड वापरले गेले. अजूनही या गाण्याची जादू आहे तशीच आहे. मग अशा गाण्याचा मोह आवरणे कठीणच नाही का.?म्हणूनच अभिनेता अंकुर वाढवेने चंद्रा साकारली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

अभिनेता अंकुर वाढवे हा चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. या कार्यक्रमातून तो आपल्या चाहत्यांना विविध भूमिकेतून हसवताना दिसतो. यावेळी त्याने प्रेक्षकांची लाडकी चंद्रा साकारली आहे. पण कार्यक्रमात नाही तर रिलमध्ये. या रिलमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री स्नेहल शिदम देखील दिसते आहे. अंकुरने केलेला पेहराव इतका सुंदर आणि मोहक आहे कि कुणीही त्याच्या स्त्री वेशाला भुलून जाईल. अंकुरने नेसलेली साडी, त्यावर परिधान केलेले दागिने, मेकअप सगळं कसं ओक्केमधी आहे. शिवाय चंद्रा या गाण्यावर थिरकताना अंकुर आणखीच लक्ष ओढून घेतोय. काय ती अदा, काय ते थिरकणं.. कमाल .. बहार.

अंकुरच्या या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात कुशल बद्रिकेने कमेंट करीत लिहिले आहे कि, ऐकत नाय चंद्रा. याशिवाय अभिनेता एकनाथ गीतेने कमेंटमध्ये म्हटलंय कि, अरे लईच गोड आहे राव.. प्रपोज करू काय या चंद्राला..? यावर अंकुरने कमेंट करीत लिहिले आहे कि, मेल्या मुडद्या लाज कशी वाटत नाही तुला बोलायला..? तर अनेक नेटकऱ्याने लिहिलंय कि, एकच हृदय आहे कितीवेळा जिंकशील..? आणखी एकाने लिहिलंय कि, खूपच छान एक नंबर सादरीकरण मेकअप सुद्धा सुंदर झालेला आहे. अशाप्रकारे सोशल मिडीयावर नेटिझन्सने या व्हिडिओला तुफान पसंती दिली आहे.

Tags: Amruta KhanvilkarAnkur WadhaveChala Hawa Yeu Dya FameInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group