Take a fresh look at your lifestyle.

तुमका भीती वाटुक होया.. कारण आण्णा नाईक परत येतले; रात्रीस खेळ चाले ३’ची नवी वाटचाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. लवकरच आता हि मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे लॉकडाऊनमुळे थांबलेले चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे काय तर येत्या पुढील महिन्यात प्रेक्षकांना आपली आवडती मालिका निश्चितच बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे. इतकेच नव्हे तर, प्रेक्षक ‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, कावेरी या पात्रांची आतुरतेने वाट बघत आहेत.

 

लॉकडाऊनमुळे या मालिकेचे शूटिंग बंद होते. परिणामी ‘रात्रीस खेळ चाले ३’ हि मालिका सध्या वाहिनीवर प्रसारीत होत नव्हती. मात्र आता मालिकेच्या नवीन भागांचे लवकरच शूटिंग सुरु होणार असल्याने हि मालिका पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील दोन्ही पर्वात अण्णा, माई, शेवंता आणि अन्य पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तर तिसऱ्या पर्वातील गोष्ट गेल्या पर्वाला जोडून असली तरी काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळे लोकांना आता उत्सुकता लागलेली आहे कि, पुढील भागांमध्ये नेमके काय पाहायला मिळणार आहेत.

या मालिकेच्या दुसऱ्या भागात अण्णा नाईक यांचे निधन दाखवल्यानंतर आता तिसऱ्या भागात अण्णा नाईक कसे परतणार? भूत म्हणून का काही रहस्य म्हणून? का अन्य कोणत्या भूमिकेत त्यांची ग्रँड एंट्री दाखवणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनाला भेडसावत आहे. शिवाय या मालिकेच्या नवीन भागांच्या प्रसारणाबद्दल बोलताना मालिकेच्या क्रू टीमने सांगितले की, रात्रीस खेळ चाले ३ हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची आमची इच्छा आहे. कथानक अधिकाधीक गूढ होत जाईल कारण अण्णा आणि शेवंता आता भूताच्या रुपात नेमकं काय करणार आहेत? वाड्याचं काय होणार? या प्रश्नांची उत्तर आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.