Take a fresh look at your lifestyle.

..कारण आता पठाण’ची वेळ सुरु होतेय; SRK’च्या बहुचर्चित चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील किंग खान अर्थात शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट “पठाण”बाबत चाहत्यांना अत्यंत उत्सुकता आहे. बरेच दिवस चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. यानंतर अखेर आज या चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पठाण पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याची पहिली झलक दीपिका आणि शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

या चित्रपटाबाबत माहिती देताना दीपिकाने अधिकृत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तसंच शाहरूख खाननेही आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे आणि हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला रिलीज होणार आहे अशी माहिती दिली आहे. दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं आहे कि, ”पठाण”. लवकरच.. या पोस्टमध्ये तिने शाहरूख आणि जॉन यांच्यासोबतच यशराज फिल्सला टॅग केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

याशिवाय अभिनेता शाहरुख खानने पोस्ट करताना लिहिलंके कि, “मला याची जाणिव आधीच खूप उशीरा झालीये. पण २५ जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा… कारण आता पठाणची वेळ सुरू होतेय….” या चित्रपटाची पहिली झलक अत्यंत लक्षवेधी आहे. शाहरूख खानचा हा नवा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होत असून यामध्ये दीपिका आणि जॉनदेखील पाहायला मिळत आहेत. अजूनतरी या चित्रपटातील नायकांचे लूक समोर आलेले नाही. मात्र पहिल्याच व्हिडिओतून डायलॉग मात्र प्रेक्षकांना मोह्ण्यात यशस्वी झाले आहेत.