हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता कोणत्याही लॉटरीशिवाय तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त ज्ञानाची असेल साथ तर करोड रुपये येतील घरात. जर तुम्हीही हेच स्वप्न उराशी बाळगत असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. कारण सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’चं हि संधी घेऊन आल आहे. होय. बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा ‘कोण होणार करोडपती’चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. तर मागील पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.
View this post on Instagram
‘कोण होणार करोडपती’ या येत्या नव्या सिझनच्या नोंदणीसाठी सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या व्यक्तींना शोच्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत का? जर माहीत असतील तर उशीर न करता हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवा.
1. “पुष्पा, पुष्पराज, मै झुकेगा नही…” ही प्रसिद्ध ओळ ‘पुष्पा द राइज’ चित्रपटात कोणत्या अभिनेत्याने म्हटली आहे?
A- अल्लू अर्जुन, B- राणा डग्गुबती, C- ज्युनिअर एन टी आर, D- प्रभास
2. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला कोणाचे नाव देण्यात आले?
A- प्रबोधनकार ठाकरे, B- यशवंतराव चव्हाण, C- आचार्य अत्रे, D- स्वातंत्र्यवीर सावरकर
3. पुढीलपैकी कोणते पात्र पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील नाही?
A- सखाराम गटणे, B- नारायण, C- अंतू बर्वा, D- चिमणराव
4. 24 नोव्हेंबर 2021 ला दक्षिण आफ्रिकेने जलद पसरणाऱ्या सार्स कोव्हीड 2च्या कोणत्या नव्या प्रकाराबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला माहिती दिली?
A- डेल्टा, B- लॅम्बडा, C- एप्लिलॉन, D- ओमिक्रॉन
5. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
A- शिवनेरी, B- पुरंदर, C- रायगड, D– मुरुड-जंजिरा