Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या भेटीसाठी अनुपम, अनिल पोहोचले रुग्णालयात; दिली हेल्थ अपडेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
262
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय क्रिकेट टीमचा स्टार यष्टीरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. ऋषभ उत्तराखंडमधील रुरकी या त्याच्या मूळ गावी जात असताना झोपेमुळे त्याचे डोळे मिटले आणि त्याची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. हि आग इतकी भीषण होती की ऋषभची मर्सिडीज कार पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने ऋषभ या अपघातातून थोडक्यात बचावला. सध्या त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनुपम खेर आणि अनिल कपूर त्याच्या भेटीसाठी गेले होते. भेटीनंतर त्यांनी बाहेर येऊन माध्यमांना त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

Im trying to control my emotion from morning but this makes me cry 😢 #RishabhPantAccident #RishabhPant #RishabhPantCarAccident #RishabhPantHospitalised #maxhospital pic.twitter.com/NgvYBTgU3E

— MaHiRΔ(Get w Soon RP17) (@ImMAHI_17) December 30, 2022

ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली असून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज सकाळी बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अनुपम खेर आणि अनिल कपूर हे डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यावेळी ऋषभ पंत आणि त्याच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. तसेच त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत काळजी घेण्याचा सल्ला दिला. यावेळी रुग्णालयात ऋषभसोबत त्याची आई आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

Uttarakhand | Actors Anil Kapoor & Anupam Kher arrived at Max Hospital in Dehradun to meet Cricketer Rishabh Pant, who is admitted there following an accident yesterday

"We met him & his mother. He is stable. Appeal to people to pray for him so that he gets well soon," they say pic.twitter.com/wuaSCr3b68

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 31, 2022

ऋषभच्या भेटीनंतर अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांना त्याच्या तब्येतीची माहिती दिली. अनुपम आणि अनिल यांनी ऋषभ आता ठीक असल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, ‘आम्ही जेव्हा येथे होतो तेव्हा आम्हाला वाटलं की देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. त्याच्या आईचीही आम्ही भेट घेतली. त्यांचे अनेक नातेवाईकही येथे उपस्थित आहेत’. दरम्यान अनिल कपूर म्हणाले की, ‘आम्ही संपूर्ण देशातील लोकांचे आशीर्वाद त्याच्यासाठी घेऊन आलो होतो. आम्ही त्यांनाही हसवले. खूप गप्पा मारल्या. तो लवकरच पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा खेळताना दिसेल. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या डोक्याचा आणि मणक्याचा एमआरआय रिपोर्ट नॉर्मल आला असून त्याच्या चेहऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यांचे काही अहवाल येणे बाकी आहे. बाकी सद्य स्थितीनुसार पुढील काही महिने तो खेळू शकणार नाही.’

Tags: ANIanil kapooranupam kherIndian CricketerRishabh PantTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group