Take a fresh look at your lifestyle.

अनुष्का झाली ट्रोल, लाडक्या लेकीला छातीशी धरत टाळले मीडिया फोटोग्राफर; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली नुकतेच मुंबई विमानतळावर आपल्या लेकीसोबत दिसले होते. ते दोघेही नेहमीच आपल्या मुलीला सेलेब्रिटी फोटोग्राफेर्स, मीडिया यांच्या कॅमेरापासून दूर ठेवण्याच प्रयत्न करीत असतात. अनुष्का आणि विराटसोबत त्यांची चिमुरडी वामिका तिसऱ्यांदा घराबाहेर दिसून आली आहे. त्यावेळी सगळेच कॅमेरा नजर रोखू लागले असता, अनुष्काने वामिकाला आपल्या छातीशी घट्ट धरले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इतकेच नव्हे तर अनुष्काच्या काळजीला सुद्धा ट्रोल केले जात आहे.

सध्या आयपीएल २०२१ सुरू असल्यामुळे अनुष्का आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच विराटसोबत आहे. वामिकालाही ती आपल्या सोबत घेऊन गेली आहे. नुकतेच तिघेही मुंबई विमानतळावर दिसले. त्यावेळी ते कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडीओ वायरल झाला. विमानतळाजवळ असलेल्या कॅमेऱ्याकडे अनुष्काचे लक्ष गेले असता तिने आपल्या छातीजवळ असलेल्या वामिकाला आणखी घट्ट धरून घेतले. वामिकाला कॅमेरांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला. फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मात्र ह्या व्हिडिओनंतर अनेक युजर्सने अनुष्काच्या काळजीला बोल लगावले आहेत. ‘लेकीचा चेहरा न दाखवायच्या नादात, ही तर तिची घुसमट करतेय.’, ‘एवढं काय लपवायचं बाळाला, एवढं लपवायचय तर बाहेर कशाला आणता?’, ‘एवढा काय भाव द्यायचा ह्यांना.. दुर्लक्ष करा.. जोपर्यंत ती स्वतः फोटो काढायला सांगत नाही तोपर्यंत. आणि नंतरही दुर्लक्षच करा.’, ‘मूल काय सगळ्यांनाच होतात, हि तर अशी वागतेय जस काय हिच्या पोटाला देवाने जन्म घेतलाय’, अशा कमेंट्स करीत अनुष्काला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. इतकेच नव्हे तर काहींनी क्रिकेटरच्या बायकांना त्यांच्यासोबत फिरायची काय गरज? घरी बसा ना गप्प असे म्हटले आहे. तर एका युजरने कोरोनाच्या भयंकर काळात त्या लहान बाळाला घेऊन नवऱ्यासोबत का फिरतेय? असा प्रश्न केला आहे.

सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी शेअर करत असतात. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय आहे. सोशल मीडियावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला यांना भरभरून पसंती मिळताना दिसते. त्यामुळे असे फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकार विशेष प्रयत्न करताना दिसतात. मात्र अनुष्का- विराटने आपल्या मुलीला नेहमीच यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या जन्मानंतर त्यांनी एक पोस्ट करत तशी विनंती केली होती. कृपया आमच्या नवजात बाळाचे फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्काने फोटोग्राफर्सला केली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी लिहिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.