Take a fresh look at your lifestyle.

आमिर खानच्या लेकीचं नाव चुकीचं घेणाऱ्यांना बसणार ५ हजारांचा दंड, पहा हा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा, अभिनेता आमिर खानची मुलगी अद्याप तरी सिनेसृष्टीत झळकलेली नाही. मात्र तरी हि “हम किसीसे कम नही”, म्हणत ती वारंवार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. याहीवेळी काही वेगळ्याच कारणामुळे ती अतिशय चर्चेत आहे. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओत ती स्वतःचे नाव इरा नसून आयरा आहे हे सांगताना दिसतेय. तसेच तिचे नाव चुकीचे घेतले असता, ५ हजार रुपरांचा दंड आकारला जाईल आणि ते पैसे ती महिन्याच्या किंवा वर्षाच्या अखेरीस देणगी देईन असे म्हणतेय. हा व्हिडीओ प्रचंड वायरल होत आहे.

आयरा सोशल मिडीआयवर सक्रिय असल्यामुळे तिच्या फॉलोवर्स चा आकडा मोठा आहे. इंडस्ट्रीत पदार्पण न करता देखील तीच स्वतःच असं वेगळं फॅन फॉलोईंग आहे. मात्र स्वतःच्या नावाचे योग्य उच्चारण करण्यात येत नसल्याने ती थोडी अस्वस्थ झाली आहे. यासाठीच तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आयराने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या नावाचा योग्य उच्चार कसा करायचा हे तिने सांगितले आहे. तसेच जे लोक योग्य उच्चारण करणार नाहीत, त्यांना कडक इशारादेखील दिला आहे. आयरा खानने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, माझे काही मित्र मला नावावरून चिडवत असतात. ते सर्वजण मला इरा अशी हाक मारतात. त्यामुळे मी माझे नाव योग्य पद्धतीने कसे उच्चारण करायचे, हे सांगण्याचा निर्णय घेतला आहे. माझे नाव आयरा असे आहे. उदा. आई आणि रा. यानंतर जर कोणी मला इरा म्हणत असेल, तर त्याला पाच हजार रुपये जमा करावे लागतील, जे मी महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी देणगी देईन. प्रत्येक जण मला इरा म्हणून बोलवतात. प्रेस, मीडिया आणि आपणा सर्वांसाठी माझे नाव आयरा असे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.