Take a fresh look at your lifestyle.

शारदीय नवरात्रौत्सवात अभिनेत्रीने धारण केले देवीचे स्वरूप; पाहाल तर तुम्हीही भारावून जालं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र एक उत्साह, आनंद, पावित्र्य, मांगल आणि सात्विक प्रसन्नतेचं वातावरण पसरलं आहे. शिवाय आजच्या या पवित्र दिवसाचे औचित्य साधून राज्यातील प्रार्थनास्थळे देखील उघडण्यात आल्यामुळे सर्वत्र आणखीच आनंदी आनंद आहे. या ९ दिवसांच्या उत्सवात नारीशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व आहे. याच दरम्यान एका अभिनेत्रीने एक स्पेशल फोटोशूट केले आहे. तिने देवी आईचे रूप धारण करून केलेले हे फोटोशूट दररोज एक अशापद्धतीने प्रदर्शित होईल. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून रात्रीस खेळ चाले फेम अपूर्व नेमळेकर आहे.

काही तासांपूर्वीच रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एका अभिनेत्रीने देवीचं रुप धारण करुन खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने इंस्टावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे या दैवी रूपात तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर करवीर निवासिनी आई अंबाबाईचं रुप धारण करुन तिने हे फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये अपूर्वाने मळवट भरला असून देवीप्रमाणेच तिने अलंकारही धारण केले आहेत. तिचं हे रुप इतकं लक्षवेधक आणि मोहक आहे कि बस्स पाहतचं राहावंसं वाटत.

अपूर्वाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘नवरात्रीचा पहिला दिवस, रंग- पिवळा, देवी महालक्ष्मी (अंबाबाई). कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखली जाते. मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!’

अपूर्वाप्रमाणेच दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडितही देवीच्या विविध रुपात हटके फोटोशूट करताना दिसते. गतवर्षी अर्थात २०२० साली तिने साकारलेली देवीची रूपं हि कोविड योद्ध्यांचे आभार मानण्यासाठी केलेले फोटोशूट होते. हे फोटोशूट अत्यंत लोकप्रिय फोटोशूटपैकी ठरले असून आता अपूर्वाचेही फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.