दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाकडून चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सिद्धार्थचा चाहता वर्ग हा फार मोठा असून त्याची आठवण आजही त्यांनी जिवंत ठेवली आहे. मात्र सिद्धार्थचे अचानक निघून जाणे त्याच्या परिवारासाठी आजही मान्य करणे कठीणच आहे. सिद्धार्थची आई अजूनही आपल्या मुलाच्या निधनाच्या दुःखात आकंठ बुडालेली आहे. यानंतर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने सिद्धार्थच्या नावाचा वापर केल्याचे दिसून येत आहे. हि बाब सिद्धार्थच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मंगळवारी चाहत्यांना एक विशेष आवाहन केले आहे. यात सिद्धार्थ शुक्लाचे नाव यापुढे कोणत्याही ठिकाणी वापरायचे असल्यास पहिल्यांदा आम्हाला विचारण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
— Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) January 25, 2022
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांनी भावुक अंतःकरणाने सांगितले आहे कि, सिद्धार्थ आपल्यात नाही, परंतु त्याच्या आठवणी आपल्याबरोबर अजूनही ताज्या आहेत. त्याने आत्तापर्यंत स्वतःचे केलेले नाव स्वतः मिळवलेला सन्मान याचा आदर ठेवून यापुढे सिद्धार्थ शुक्लाचे नाव कोणत्याही कार्यक्रमात, मालिकेत, सिनेमात किंवा कोठेही वापरण्याआधी आमच्या परिवाराकडून अनुमती घ्यावी हि विनंती. आम्ही या केलेल्या वक्तव्याचा सन्मान करावा. त्याच्या नावाचा त्याच्या चेहऱ्याचा वापर करण्याआधी सिद्धार्थचे नाव वापरण्याआधी संबंधितांनी आम्हाला संपर्क करावा.”
पुढे म्हटले कि, “काही योजना या अजून प्रेक्षकांसमोर आल्या नाहीत याचे मुख्य कारण योजनेला सिद्धार्थ शुक्लाची अनुमती नव्हती. आम्ही देखील त्याला आवडणारी गोष्ट लोकांसमोर यावी यासाठी जास्त प्रयत्न करू. यासाठीच त्याच्या अपरोक्ष त्याचे नाव त्याचा चेहरा कोणी वापरू नये त्याचा गैरफायदा घेऊ नये त्यासाठी आम्ही ही विनंती करत आहोत.”
View this post on Instagram
सिद्धार्थ शुक्लाचे गतवर्षी २ सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले होते. यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना हा धक्का पचविणे जणू अशक्य झाले होते. शिवाय सिद्धार्थची जवळची मैत्रीण शेहनाजची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तिचा तो चेहरा आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतो.