Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अप्पी आमची कलेक्टर! झी मराठी घेऊन येतेय नवी मालिका; पहा प्रोमो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
Appi Amchi Collector
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल मराठी प्रेक्षक किती आवडीने मराठी मालिका आणि चित्रपट पाहतो हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे मराठी वाहिन्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. मराठी वाहिन्यांपैकी ‘झी मराठी’ हि वाहिनी तर तुफान चालते. विविध कथानकांच्या मालिका या वाहिनीवर सुरु आहेत. यांपैकी माझी तुझी रेशीमगाठ, मन उडू उडू झालं, तू तेव्हा तशी या मालिका तर प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. यांनतर आता मालिकांचा प्रेक्षक वर्ग वाढत चालल्याचा दिसत असताना एक आणखी वेगळा विषय घेऊन नवी मालिका लवकरच येते आहे. या मालिकेचे नाव ‘अप्पी आमची कलेक्टर’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि नवी कोरी मालिका सुरु होत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ही मालिका २२ ऑगस्ट २०२२ पासून संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्रॉडक्शनने केली आहे. काही दिवसांपूर्वीच निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदेने या नव्या मालिकेची घोषणा केली होती. ‘अप्पी म्हणजे अपर्णा सुरेश माने हि एका रिक्षा वडाप चालकाची मुलगी आहे. जी कलेक्टर होऊन लोकांचे प्रश्न सोडवते. अशी काहीशी या मालिकेची कथा आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Naik (@shivaninaikofficial)

अप्पी या मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री शिवानी नाईक दिसते आहे. आपल्या नव्या आणि आव्हानात्मक भूमिकेबाबत बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, ‘मी खूप भाग्यवान आहे की, मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळते आहे. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. यातच मी खूप खुश आहे. कारण मी एका महत्त्वकांक्षा असणाऱ्या मुलीची अत्यंत अनोखी आणि महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मला आशा आहे कि, ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.’

Tags: Appi Amchi CollectorInstagram PostViral Videozee marathiZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group