Take a fresh look at your lifestyle.

‘सगळ्यांच्या नाकावर टिच्चून..’; नथीच्या ब्रँडला बायकोचं नाव मिळताच प्रसाद ओकने केली भन्नाट पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून लोकांच्या मनावर राज्यकारणाऱ्या प्रसाद ओकबद्दल बोलावे तितके कमीच. त्यात प्रसाद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे तो काय करतोय हे काही वेगळे सांगायची गरज नाही. पण आज त्याच्याबद्दल नव्हे तर त्याच्या पत्नीबद्दल लिहिण्याचा दिवस आहे. कारणही तसेच आहे. प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकच्या नवे आता बाजारात नथ मिळणार आहे. हि बाब जितकी कौतुकास्पद आहे तितकीच एक पती म्हणून प्रसादला भावुक करणारी आहे. यासाठी त्याने एक भन्नाट भारी कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने बायकोच कौतुक केलंच शिवाय तिच्या मैत्रिणींना कडक टोमणा सुद्धा लगावला आहे.

अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक ही स्वतः एक व्यावसायिक आहे. ती सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून छोट्या उद्योजकांना मदत करत असते. याचमुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राच्या लेकीचं रुपडं आणखी लक्षवेधी वनवणाऱ्या महाराष्ट्रीयन नथीला मंजिरी ओकचे नाव मिळाले आहे. ही नथ आता ‘मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाणार आहे. याबाबत प्रसादने स्वतः सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये प्रसादने लिहिले कि, प्रिय मंजू.. आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला तुझं नाव लागलंय. “मंजिरीनथ” आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली…तुझ्या सो कॉल्ड जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत…या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम #फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर. असे लिहीत प्रसादने बायकोचे कौतुक करीत तिला नावं ठेवणाऱ्यांना बोल लगावले आहेत.

मंजिरी ओकनेदेखील पोस्ट लिहित सर्वांचे आभार मानले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी या उद्देशानी मी “कोलॅबोरेशन” सुरु केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला माझं नाव दिलं गेलंय “मंजिरी नथ”.लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले…करत राहीनच… पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान सुद्धा आहे… आणि तो तंतु यांच्यामुळे आलाय. तेव्हा स्वाती घोडके यांचे मनःपूर्वक आभार.