Take a fresh look at your lifestyle.

ए.आर.रेहमान यांची लता दीदींना श्रद्धांजली; थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि जगभरातून अक्षरशः टाहो फुटला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतरही लता दीदींची न्यूमोनियाशी झुंज सुरूच होती. अखेर हि झुंज अपयशी झाली आणि लता दीदींना देवाज्ञा झाली. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर, अक्षय कुमार आणि विशाल ददलानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय ए. आर. रेहमान यांनी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताण एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. याशिवाय एका व्हिडीओ पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संगीतकार ए आर रहमान यांनी ट्विटरवर लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि श्रद्धांजली वाहिली. फोटोमध्ये रहमान जमिनीवर बसलेले दिसत आहेत तर लता दीदी सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. रेहमान यांनी फोटोसोबत लिहीले कि, “प्रेम, आदर आणि प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली! याशिवाय रहमान यांनी व्हिडीओ पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी एक किस्सा सांगितलं आहे. रेहमान म्हणाले कि, रंग दे बसंती च्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांनी लिल्टिंग मेलडी, लुका छुप्पी कसे रेकॉर्ड केले. हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी लता मंगेशकर ८ तास उभ्या राहिल्या होत्या.

पुढे म्हणाले कि , “त्या माईकवर उभ्या राहीलया, आम्ही खोलीत होतो. त्यांची वेणी जमिनीला स्पर्श करत होती. आम्ही त्यांच्यासाठी काही फुले, पाण्याची बाटली आणि एक खुर्ची ठेवली. यानंतर तब्बल ८ तास त्यांनी गाणे गायले आणि ८ तास त्या तिथे अभ्यास होत्या अगदी खुर्ची असूनही. लता दीदी आमच्या स्मरणात तुम्ही कायम रहाल. सलाम तुम्हाला. भावपूर्ण श्रद्धांजली!