Take a fresh look at your lifestyle.

AR Rahman यांच्या मुलीचा निकाह संपन्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कला क्षेत्रात अतिशय मानाने घेतले जाणारे नाव म्हणजे संगीतकार (AR Rahman) ए. आर. रहमान. रहमान यांची कारकीर्द भली मोठी असून त्यांच्या कलेचा दर्जा अतिशय उंच आहे. संपूर्ण जगभरात त्यांच्या चाहत्यांची काहीच कमी नाही. आजतागायत त्यांचे एकही गाणे फ्लॉप झाल्याचे ऐकण्यात नाही. अशा रहमान यांच्या घरी आनंद ओसंडून आला आहे. एक वडील म्हणून त्यांनी आपल्या जबाबदारीची पूर्तता करीत मुलगी खातिजा रहमान हिचा निकाह करून दिला आहे. मोठ्या दिमाखात खातिजाचा निकाह रियासदीन शेख मोहम्मद याच्याशी पार पडला. ही आनंदाची बातमी स्वतः ए आर रहमान यांनी सोशल मीडियावर दिली आहे. आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांच्या चाहत्यांनी या फोटोंवर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

(AR Rahman) रहमान यांची मुलगी खातिजाच्या ‘निकाह’ समारंभातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रहमान यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. ए. आर. रहमान यांची मुलगी खातिजा आणि रियासदीन शेख मोहम्मद यांचा गतवर्षी २९ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा (सगाई) पार पडला होता. यानंतर आता नुकताच या जोडप्याचा निकाह झाला आहे. या निकाह सोहळ्यातील फोटो शेअर करत ए आर रहमान यांनी अतिशय मनोवेधक असे एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे, “या जोडप्याला विधात्याचे आशीर्वाद मिळो.. ‘ पुढे त्यांनी चाहत्यांना उद्देशून लिहिले आहे की, ‘तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद’. हा फोटो आणि कॅप्शन पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

(AR Rahman) ए आर रहमान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते स्वतः, सोबत त्यांची पत्नी सायरा बानो आणि त्यांची मुले, आमीन आणि रहीमा यांच्यासह नवविवाहित जोडपे म्हणजेच खातिजा आणि रियासदीन दिसत आहेत. तसेच ए. आर. रहमान यांची आई करीमा यांचा फोटोही नवविवाहित जोडप्याजवळ आशीर्वाद म्हणून ठेवण्यात आला आहे. रहमान यांची मुलगी खातीजानेही तिच्या निकाहचा फोटो शेअर केला आहे. ‘या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते. माझ्या माणसाशी अखेर मी विवाह बंधनात अडकले’ असे तिने सोबत कॅप्शन लिहिले आहे.

 

‘हे’ पण वाचा:-

स्मशानभूमीत ‘फनरल’चा मुहूर्त संपन्न; हेड कॉन्स्टेबल वारेंच्या हस्ते पोस्टर रिलीज पहा फोटो

रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ कायदेशीर अडचणीत; एका सीनमुळे उफाळला वाद

ते रिलेशनमध्ये आहेत का..? व्हायरल व्हिडिओनंतर शेहनाज- सलमानच्या लव्ह कनेक्शनची चर्चा