Take a fresh look at your lifestyle.

आर्चीच्या ‘मेकअप’ चा कडक ट्रेलर रिलीज . . . !

” हर देवदास कि गर्लफ्रेंड पारो नही होती ऑर ६% वाली दारू कभी अल्कोहोल नही होती ”
आपल्या लाडक्या आर्चीच्या ‘मेकअप’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. आर्चीने तिच्या इन्स्टा अकाउंट वर आपल्या येणारी आगामी चित्रपटाचा ट्रेलर टाकला आहे .

१०० टक्के बिनधास्त… १०० टक्के चुलबुली… आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल… असलेल्या ‘पूर्वी’ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना ‘मेकअप’चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. टीझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकच वाढली आणि आता पूर्वीचा हा ‘मेकअप’ रसिकांना अधिकच रंगवणार आहे असे दिसून येत आहे.

ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी तर दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, मेकअप’वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे, हे जरा प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे.

ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत ते मेकअप बघिल्यावरच समजणार. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि पूर्वीच्या आयुष्यात तिचा ‘हॉट’ राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उद्गीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.