Take a fresh look at your lifestyle.

कलादिग्दर्शक नितीन देसाईंचा ND स्टुडिओ होरपळला आगीत; तब्बल दिडतासानंतर आग विझवण्यात आले यश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत रस्त्यावर असलेल्या एनडी स्टुडिओमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे हि आग लागल्याचे वृत्त आहे. हि घटना दुपारी १२ ते १२.१५ च्या सुमारास घडली असून ह्या आगीचा धूर ४ ते ५ किलोमीटर दूरपर्यंत दिसत आहे. दरम्यान शनिवार वाड्याचा सेटही जवळ असल्याने जळाला असल्याची माहिती येत आहे. दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडिओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

खालापूर तालुक्यातील हातणोली-चौक येथील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत आज दुपारी आग लागली आहे. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग प्रचंड असून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली आहे. या भीषण आगीत बरेच आर्थिक नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती मिळत आहे. तर आग लागण्याचे कारण अद्याप काही समोर आलेले नाही.

घटनास्थळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाले आहेत. तसेच फायर ब्रिगेडच्या ३ गाड्या बोलाविण्यात आल्या आहेत. जवळजवळ दीड तासानंतर हि आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अस्पष्ट आहे. सध्या या संदर्भात पोलीस तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.