Take a fresh look at your lifestyle.

मला न्याय द्या! कलादिग्दर्शक राजेश सापतेंची आत्महत्या; सुसाईड व्हिडीओमूळे चित्रपटसृष्टीत खळबळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सिनेसृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकारांच्या आत्महत्या हा दररोजचा विषय झाला आहे. यात दुःखद बातमी म्हणजे चित्रपट सृष्टीतील आणखी एका कलाकाराने चक्क सुसाईड व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून आपल्या आयुष्याचा अंत केला आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन जगतात कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजेश मारुती सापते अर्थात राजू संपते यांनी आज आत्महत्या करुन सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

राजेश साप्ते यांनी स्वतःच्या पुणे येथील राहत्या घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण सांगितल आहे. या व्हिडिओत ते म्हणाले कि, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते . मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.

माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे सांगून संपते यांनी व्हिडीओ बंद केला. या व्हिडिओतून संपते यांनी त्यांना होणार मानसिक त्रास व्यक्त केला आहे यंत्रणेकडे न्यायाची मागणी देखील केली आहे. दरम्यान, या घटनेने सध्या मराठी चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ उडालेली आहे. तूर्तास या प्रकरणा संदर्भात पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र या सर्वांत चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान करून राजेश सापते यांनी आपल्या जीवनाचा अंत केला हि अत्यंत मन खिन्न करणारी घटना घडली आहे, हे नक्कीच.