Take a fresh look at your lifestyle.

पुन्हा एकदा बदलणार “आई माझी काळूबाई’ मालिकेची मुख्य अभिनेत्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सोनी मराठी या वाहिनीवरील “आई माझी काळूबाई” या मालिकेत पुन्हा एकदा बदल होणार आहे. या मालिकेतील मुख्य पात्र “आर्या” पुन्हा एकदा एका नव्या नायिकेकडून भूषविले जाणार आहे. मालिकेच्या सुरुवातीस प्राजक्ता गायकवाड त्यानंतर वीणा जगताप आणि आता कोण ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मालिकेच्या सुरुवातीस प्राजक्ता गायकवाड़ हिने आर्या हे पात्र भूषविले होते. मात्र प्राजक्ताची सेटवरील वर्तवणूक योग्य नसल्याचे कारण देत, निर्मात्या अलका कुबल यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. यानंतर प्राजक्ताच्या जागी बिग बॉस मराठी सीजन २ फेम वीणा जगताप हि भूमिका साकारत होती. मात्र, आता वीणाने देखील मालिकेस टाटा बाय बाय केला आहे. मालिकेच्या शूटिंग शेडूयलमुळे वीणा वारंवार आजारी पडत होती. त्यामुळेच तिने मालिका सोडल्याचे म्हटले जात आहे. शिवाय या मालिकेमुळे शीव आणि वीणा यांच्या नात्यात दुरावा आला आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेतील ‘आर्या’ हे मुख्य पात्र आता नवी अभिनेत्री साकारणार आहे.

प्रेक्षकांच्या भेटीस येणारी नवी आर्या हि दुसरी तिसरी कुणी नसून रश्मी अनपट-खेडेकर हि अभिनेत्री आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र २’, यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली रश्मी आता “आई माझी काळूबाई” या मालिकेची मुख्य नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खरंतर एका मालिकेतील मुख्य पात्र वारंवार बदलत राहणं प्रेक्षकांसाठी नाराजीच कारण ठरलं आहे. मात्र रश्मी या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणे विशेष असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.