Take a fresh look at your lifestyle.

‘मन्नत’पासून पुन्हा दुरावणार आर्यन खान; पिता म्हणून शाहरुख खानचा मोठा निर्णय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील किंग खान अर्थात शाहरूख खान सध्या एका वेगळाच कारणामुळे चर्चेत असल्याचे आपण पाहीले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई कॉर्डेलिया ड्रग्ज केस प्रकरणात अटक झाल्यानंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये विविध चर्चा पाहायला मिळाल्या. आर्यन खान तब्बल २७ दिवस NCB च्या अटकेत आणि तुरुंगवास भोगत होता. पण अलीकडे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी हाय कोर्टाने दिलासा देत आर्यनला जामीन मंजूर केला. यामुळे त्याची घरवापसी झाली. पण आता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान आपला मोठा मुलगा आर्यन खानच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत आधीपेक्षा जास्त स्ट्रिक्ट झाले आहेत. यामुळे लवकरच पुन्हा एकदा आर्यन घरापासून दुरावणार अशी चर्चा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरूख आणि गौरी यांनी आर्यनसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानसोबत त्याचे बॉडीगार्ड त्याच्या सावलीप्रमाणे नेहमीच सोबत असतात. यानंतर आता आर्यनकडेही बॉडीगार्ड असणार आहे. याशिवाय बॉलिवूड लाईफ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘शाहरूखला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तो आतून पूर्ण हादरला आहे. यामुळे तो हा विचार करतोय की, जर आर्यनकडे स्वत:चा बॉडीगार्ड असता तर कदाचित हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. त्यामुळे तो आता लवकरच आर्यनसाठी बॉडीगार्ड ठेवणार आहे’. इतकेच नव्हे तर त्याला मन्नतपासूनही दूर करण्याची शक्यता आहे.

यानंतर सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीमध्ये अश्या चर्चानी जोर धरला आहे कि,  शाहरूख खान आणि पत्नी गौरी खान आर्यन खानला दिवाळीनंतर मन्नतपासून दूर करण्याचा विचार करत आहे. ड्रग्स केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करावा लागला. अटीनुसार आर्यन विना परवानगी मुंबई किंवा भारतातून बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे शाहरूख खान आर्यनला अलिबागमधील फार्म हाऊसवर शिफ्ट करेल, असे सांगण्यात येत आहे.