Take a fresh look at your lifestyle.

..जमिनीवर कोसळले अन्; आशा भोसलेंचा मुलगा उपचारार्थ रुग्णालयात दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले सध्या चिंतेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा मुलगा आनंद भोसले यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच झालं असं कि, आनंद भोसले याना भोवळ आली आणि ते अचानक जमिनीवर कोसळले. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र याची माहिती आता समोर येत आहे. सध्या आनंद यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आनंद भोसले याना भोवळ आली आणि त्यामुळे ते अचानक जमिनीवर कोसळले. दरम्यान त्यांना किरकोळ दुखापतसुद्धा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांना इमर्जंसी केस म्हणून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे अशी माहिती ‘ई टाइम्स’कडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर आशा भोसले आणि मंगेशकर कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.

आनंद भोसले यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांना दुबईला सतत संपर्क साधत आहेत. माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी आशा भोसले या दुबईतच होत्या. त्यामुळे आता आनंद यांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत त्या दुबैतच राहणार आहेत. अजूनही आनंद भोसले यांची प्रकृती पूर्ण स्थिर नसल्यामुळे ते रुग्णालयातच आहेत. यामुळे त्यांची आई अर्थात आशा भोसले या वेळोवेळी रुग्णालयात जाऊन मुलाच्या प्रकृतीची चौकशी करत आहेत. आनंद यांना डॉक्टरांकडून कधी डिस्चार्ज मिळेल, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र प्रकृती सुधार पाहताच लवकर त्यांना घरी सोडण्यात येईल असे सांगितले आहे.

आशा भोसले यांच्या तीन मुलांपैकी आनंद हे सर्वांत लहान आहेत. आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचे २०१५ साली कॅन्सरमुळे निधन झाले तर मुलगी वर्षा भोसलेने आत्महत्या केली. त्यामुळे आशा भोसले या त्यांचा सर्वात लहान मुलगा आनंद भोसले यांच्या प्रकृतीबाबत नेहमीच चिंतीत असतात. अगदी काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आशा ताईंवर एकटेपणाची सावली पडली. दीदी या त्यांचा आधारस्तंभ होत्या आणि त्यांच्या जाण्याचे आशा भोसले फारच कष्टी होत्या. त्यात आता आनंद यांची प्रकृती बिघडल्याने आशा भोसले फार चिंतीत असल्याचे समजत आहे.