Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अश्विनी भावे आणि अजिंक्य देव 25 वर्षांनी पुन्हा एकत्र; फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 6, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
0
SHARES
854
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी भावे आणि मराठी अभिनेते अजिंक्य देव हि दोन्ही नावे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेली नावे आहे. गेली अनेक वर्ष हे कलाकार चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. जे आजही आणि अजूनही जसेच्या तसे अढळ आहे. अश्विनी आणि अजिंक्य यांनी ‘सरकारनामा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि या चित्रपटाची २५ वर्ष ते यंदा साजरी करत आहेत. अशातच अश्विनी यांनी अजिंक्य यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत लिहिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अश्विनी यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि ते एकत्र काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या फोटोला कॅप्शन देताना अश्विनी म्हणाल्या कि, ‘सरकारनामा’ या चित्रपटाचे रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करत आहोत. अशातच मी आणि अजिंक्य आम्ही एकत्र पुन्हा चित्रीकरण करत आहोत. तेही २५ वर्षांनी..’ सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरतो आहे. अद्याप त्यांच्या एकत्र येण्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र नीट फोटो पाहिला असता हा एखाद्या शूटिंग लोकेशनवरील क्लिक असल्याचे समजते.

आता येत्या काळात अश्विनी भावे आणि अजिंक्य देव एकत्र काय नवं प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ प्रचंड गाजवला आहे. रसिकांच्या मनावर त्यांनी तेव्हाही अधिराज्य गाजवलं होत आणि आजही गाजवणार यात काही शंकाच नाही. ‘धडाकेबाज’, ‘बनवाबनवी’, ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील काही हुकमी एक्के ठरले. तर अभिनेते अजिंक्य देव यांनी एक काळ नुसता गाजवला नाही तर ते विशेष चर्चेत राहिले. ते अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत होते. ‘माझं घर माझा संसार’, ‘माहेरची साडी’, ‘मायेची सावली’, ‘भातुकली’, ‘क्रांतिवीर’ हे त्यांचे काही विशेष गाजलेले चित्रपट आहेत.

Tags: ajinkya deoAshvini BhaveFacebook PostMarathi ActorsViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group