Take a fresh look at your lifestyle.

ना..डे राजकारणी…ना..डं सरकार…ना..डा देश…;सरकारवर संताप व्यक्त करताना आस्ताद काळेचा शाब्दिक तोल ढासळला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दररोज कोरोना रुण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णालयातील परिस्थिती गंभीर व चिंताजनक आहे. बेड मिळत नसल्यामुळे आणि ऑक्सिजन अभावी अनेकांनी प्राण सोडले आहेत. यामुळे आता देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका होताना दिसतेय. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने सरकार आणि राजकारण्यांचा शाब्दिक ओरखडले आहे. मात्र संतप्त प्रतिक्रियेतून व्यक्त होताना राजकारणी आणि सरकार यांसमवेत देशाबाबतही आस्तादने गरळ ओकली आहे.

बिग बॉस फेम आस्ताद काळेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सरकार आणि राजकारण्यांवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. त्याने म्हटले की, प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…..नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो…. आस्ताद काळेने या पोस्टमध्ये राजकारणी,सरकार यांच्या यादीत देशाचाही उल्लेख केला केला. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी सहमती दर्शविली आहे तर कुणी देशाबाबत बोलताना शब्दांचे तोल सांभाळावे अशी विनंती केली आहे.

आस्तादने देशातील राजकारणी, राज्य आणि केंद्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खडा सवाल केला आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला असताना देशात चार राज्यात निवडणुका झाल्या. त्यासाठी रॅलीसुद्धा काढण्यात आल्या. त्यावर आस्तादने टीका करत म्हटले होते की, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे तर काहीतरी होऊ शकते. निवडणुक अमूक काळ उलटल्यानंतर घेणे हे आपल्या संविधानात लिहिले आहे. पण ते परिस्थिती पाहून बदलू शकतो याची तरतूददेखील संविधानात केलेली आहे. सध्याच्या घडीला निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे की परिस्थिती आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे एक वर्षे होते. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार..तुम्ही एका वर्षात केलंत काय ? असा सवालही आस्तादने केला होता.