Take a fresh look at your lifestyle.

वयाच्या 46’व्या वर्षी प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई; जाणून घ्या मुलांची नावं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. होय. अनेकांना हि बातमी वाचून आश्चर्य वाटले असेल पण प्रितीने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून हि गुड न्यूज सर्व चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एकावेळी २ मुलांना जन्म दिला असून ती वयाच्या चाळिशीनंतर आई झालीये. प्रीती आणि तिचा पती जेन गुड इनफ हे दोघेही अत्यंत आनंदी आहेत. कारण आई बाबा होण्याचा आनंद काही औरच असतो नाही का..

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने हि बातमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना लिहिले आहे कि, ‘मी आज सर्वांना अत्यानंदाची बातमी देऊ इच्छिते. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची मनं कृतज्ञतेनं भरून आलंय. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत करतोय,’ या पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. जय आणि जिया अशी दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरोगसीच्या माध्यमातून या दोन चिमुकल्या जुळ्यांचा जन्म झाला आहे. यापैकी एक मुलगा आहे व एक मुलगी.

तर या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले कि, ‘आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणा-या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मन:पूर्वक आभार;. प्रीतीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा आणि प्रेम व्यक्त केले आहे. तर अनेक ट्रोलरने प्रीतीला तिच्या वयावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ज्याकडे लक्ष देणे सध्यातरी प्रीती किंवा जेन याना गरजेचे वाटत नाही.

पाच वर्षांपूर्वी प्रीतीने तिच्यापेक्षा १० वर्ष लहान असणाऱ्या अमेरिकन मुलासोबत अर्थात तिचा बॉयफ्रेन्ड जेन गुड इनफसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांनी २९ फेब्रुवारी २०१६ शाळांमध्ये लॉस एंजिलिसमध्ये हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नाची बातमी प्रीतीने अनेक महिने लपवून ठेवलेली. साधारण ६ महिन्यानंतर तिचं लग्नाचे फोटो समोर आले होते. प्रीती व जेन दोघेही सध्या अमेरिकेतच राहतात. जेन पेशाने फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट आहे. प्रीतीने १९९८ सालामध्ये मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने अनेक दमदार आणि हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.