Take a fresh look at your lifestyle.

गोखलेंवर कुलकर्णींचा बेनाम पण अचूक निशाणा; दोन शब्दांत दिला शहाणपणाचा डोस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच या ना त्या कारणामुळे वादात असणारी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रनौतने अलीकडेच देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. यात तिने म्हटले होते कि १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, तर २०१४ मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं. यानंतर देशभरातून तिच्यावर टीकांचा वर्षाव झाला असताना मराठी ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याचे जाहीर समर्थन केले आणि नवा वाद ओढवून घेतला. त्यामुळे आता टीकांमध्ये कंगनासोबत गोखलेंची अगदी बरोबरीची भागेदारी आहे. यानंतर आता मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ट्वीटरवर अगदी नाव न घेता विक्रम गोखले यांच्यावर अचूक निशाणा साधला आहे.

मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केलेल्या ट्विटमध्ये अगदी उरकत्या दोन शब्दांमध्ये विक्रम गोखले यांचे नाव न घेता जोरदार बॅटिंग करीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये अतुल कुलकर्णी यांनी लिहिलं आहे कि, वयाचा आणि शहाणंपणाचा दुरान्वये संबंध नसतो. हे इतकंच पुरेसं होत कारण नाव घेतलं नसलं तरीही लोकांना या ट्विटचा बरोबर अर्थ लागला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर गोखलेंसाठीचे कुलकर्णींचे हे दोन शब्दाचे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे.

त्याच झालं असं कि, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एका मुलाखतीत म्हटले कि, भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळाले. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना यात विक्रम गोखले यांनी उडी घेतली. मराठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी त्यांनी देशाचं राजकरण आणि चालीत मुद्द्यांवर भाष्य केलं.

माध्यमांशी संवाद साधताना गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रनौतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही. यामुळे गोखलेंवर सध्या विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.