Take a fresh look at your lifestyle.

उषा आणि पांडूची ‘बुरुम बुरुम’ टूर; ‘पांडू’ चित्रपटाच्या पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। याच वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर सर्वांमध्ये या चित्रपटात कोण कलाकार असतील ते चित्रपटातील नाविण्याबाबत बरीच चर्चा रंगली होती. अखेर या महिन्यात दिवाळीच्या आठवड्यात ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आता आणि मग सर्वांनाच कळलं कि भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हि जबरदस्त कॉमिक जोडी पांडूचे कथानक बहारदार करणार आहे. दादा कोंडकेंच्या चित्रपटात पांडू आणि महादू अशी जबर जोडी दादा कोंडके आणि अशोक सराफ यांनी साकारली होती. यानंतर पांडूच्या भूमिकेत भाऊ आणि महादूच्या भूमिकेत कुशल दिसणार आहेत. यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले असून यात पांडू त्याच्या उषासोबत बुरुम बुरुम करताना दिसतोय.

या गाण्याला एका दिवसात तब्बल ५० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात आपल्याला भोळा भाबड्या पांडूच्या भूमिकेत भाऊ कदम आणि नखरेल नार उषाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी अशी हि भन्नाट जोडी पाहायला मिळतेय. हे गाणे प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर हे गाणे अवधूत गुप्तेने स्वतः लिहिलेले आहे. या गाण्याचे ताल अगदी तुम्हालाही ठेका धरायला लावणारे आहे. तर गाण्याचे बोल इतके मजेशीर आहेत कि अगदी दादा कोंडकेंची आठवण होतेय असे अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे.

दादा कोंडकेंचा सदाबहार चित्रपट पांडू आता थोडा आधुनिकरीत्या हलके फुलके धमाल मनोरंजन करण्यास सज्ज आहे. सोबत झी स्टुडिओजची निर्मिती आणि विजू माने यांचे दिग्दर्शन हि एक महत्वाची पर्वणी आहे यात काही वादच नाही. या चित्रपटात आपल्याला भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रिके आणि प्राजक्ता माळी या कलाकारांच्या अव्वल भूमिका पाहायला मिळतील. ‘पांडू’ हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भरपूर दिवसांनंतर एक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. काय मग? उत्सुकता वाढली ना? येत्या ३ डिसेंबर २०२१ रोजी जरूर चित्रपटगृहात जाऊन पहा… ”डोक्यावर घालून टोपी, हातात घेऊन दांडू. तुम्हाला हसवायला ‘पांडू’!