Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कधी न तुला..; ‘जग्गू आणि ज्युलिएट’च्या रोमँटिक गाण्याची नेटकऱ्यांना भुरळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu ani Juliet
0
SHARES
60
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुनित बालन स्टुडिओज् प्रस्तुत ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार वाहवा चाललेली असतानाच पुन्हा एकदा या चित्रपटातील एक गाणं रिलीज होताच चर्चेत आलं आहे. हे गाणं चर्चेत यायचं कारणंही तसं स्पेशल आहे… श्रीवल्ली फेम सिड श्रीराम या प्रसिद्ध गायकाने जग्गू आणि जुलिएट मधील ‘कधी न तुला’ हे गाणं गायलं असून रिलीज झाल्याच्या काही क्षणांतच ते व्हायरल झालं आहे. दाक्षिणात्य गायक सिड श्रीराम यांनी मराठी गाणं गायलं असून, हेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

अमेय वाघने साकारत असलेला कोळीवाड्यातला जग्गू आणि वैदेही परशुरामी साकारत असलेली अमेरिकेची जुलिएट यांची कलरफुल लव्हस्टोरी असलेला जग्गू आणि जुलिएट हा चित्रपट त्याच्या मोशन पोस्टरपासूनच चर्चेत होते. याशिवाय अजय-अतुल या लाडक्या संगीतकार जोडीची चार सुमधूर गाणी आणि महेश लिमये यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट डोळ्याच आणि कानांचं पारणं फेडणारा असेल असं दिसतंय.

‘कधी न तुला’ या गाण्यात जग्गू आणु जुलिएटला प्रेमाची जाणीव होऊन त्या प्रेमाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ओढ लागली आहे असं दिसतंय. एक हळुवार भावनेची गोष्ट सांगणारं हे गाणं आहे. अशातच या गण्याला सिडचा आवाज, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि अजय-अतुल यांचं रमणीय संगीत यांमुळे चार चाँद लागले आहेत. तसेच या गाण्यात या दोघांसबत वाहणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

Tags: Instagram PostJaggu ani JulietNew Song ReleasePunit Balan StudiosYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group