Take a fresh look at your lifestyle.

..फायर है मैं..! डेव्हिड वॉर्नरला चढली पुष्पा’ची झिंग; गाण्यानंतर आता डायलॉगवर बनवला व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचे भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचेही त्याला वेड आहे. तो सतत या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता वॉर्नरने सध्या चर्चेत असणारा चित्रपट ‘पुष्पा’मधील एका डायलॉगवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

या व्हिडीओत डेव्हिड वॉर्नरसोबत त्याची मुलगी देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये डेव्हिड वॉर्नर “पुष्पा नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..!” या अल्लू अर्जूनच्या डायलॉगवर लिपसिंग करताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची मुलगी देखील लिपसिंग करताना दिसते. डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

या आधी देखील डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत डेव्हिड वॉर्नरने ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर त्याच्या तिन्ही मुलींनी याच चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडिओवर खुद्द अल्लू अर्जुनने देखील कमेंट केली आहे. त्याने या पोस्टवर लिहिले आहे कि, सो क्युट!